कुर्ल्यात ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

मुलींसाठी सुरक्षित असलेली मुंबई आता असुरक्षित झाली असल्याचं दिसून येत आहे.

Updated: Dec 4, 2019, 11:37 AM IST
कुर्ल्यात ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार  title=

मुंबई : हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या घटनेमुळे देशात संतापाचे वातावरण असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुर्ला येथे बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. सतत होणाऱ्य़ा या बलात्कारांच्या घटनांमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

'एएनआय'नं यासंबंधी वृत्त दिलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्याचप्रमाणे त्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप त्यांचे नाव कळू शकलेलं नाही. 

मुलींसाठी सुरक्षित असलेली मुंबई आता असुरक्षित झाली असल्याचं दिसून येत आहे. हैदराबादमधील घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्रील विविध भागांत त्याचे पडसाद उमटले आहे. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. 

गुरूवारी हैदराबादमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करण्यात अली. माणूसकीला काळीमा फसणाऱ्या या घटनेला काही दिवस देखील उलटले नसताना मुंबईत अवघ्या ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. त्यामुळे पुन्हा असे सिद्ध होते की देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात मुली सुरक्षित नाहीत.