जेएनपीटी बंदरावर पन्नास किलो सोनं जप्त

समुद्रमार्गे होणा-या सोन्याच्या तस्करीचा डाव उधळण्यात आलाय. मुंबईतल्या न्हावा शेवा बंदरातून 50 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. 

Updated: Dec 30, 2017, 11:19 AM IST
जेएनपीटी बंदरावर पन्नास किलो सोनं जप्त title=

मुंबई : समुद्रमार्गे होणा-या सोन्याच्या तस्करीचा डाव उधळण्यात आलाय. मुंबईतल्या न्हावा शेवा बंदरातून 50 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. 

डीआरआय आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केलीय. एसी बॉक्समधून लपवून हे सोनं आणण्यात आलं होतं. 

मेसर्स मॅन क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हे सोने आणलं जातं होतं. आजवरील सोने तस्करी संदर्भातील ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे सांगितलं जातंय.