मुंबई : मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढतो आहे. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये रविवारी नवे 44 कोरोना रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1242वर पोहचला आहे. धारावीमध्ये आतापर्यंत एकूण 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
44 more #COVID19 cases reported in the Dharavi area of Mumbai. Total number of cases in the area rises to 1242, including 56 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/lRTYCXQLFe
— ANI (@ANI) May 17, 2020
माहिमध्ये रविवारी 6 नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे माहिममध्ये आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 193 इतकी झाली आहे.
दुसरीकडे दादरमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. रविवारी दादरमध्ये ५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली दादरमधील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 159वर पोहचला आहे.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 18 हजारांवर गेली असून आतापर्यंत 600हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. 18 मेपासून राज्यात, देशात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 मध्ये काय सुरु राहणार, काय बंद राहणार याबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी, मुंबईकराना विनंती आहे की, एवढे दिवस मेहनत घेतली आहे, आता आणखी काही दिवस घरी राहा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाविरोधातील हा लढा अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला नक्की यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.