मुंबई : लालबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लालबाग येथील गणेश गल्ली परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये २० जण भाजले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.सर्व जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
20 people injured in a cylinder blast in Lalbaug area of Mumbai, Maharashtra. Two fire brigade and two jumbo tankers are on the spot: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) December 6, 2020
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एका बंद खोलीत हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
लालबाग येथे साराभाई इमारत येथे सिलेंडरचा स्फोट झाला आहे. हा स्फोट नक्की कसा झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.