राखीने केला गंभीर आरोप ,म्हणते माझं आयुष्य झालं बरबाद..

माझा चेहरा सुजलेला दिसतोय. मला झोप येत नाही. अर्धा तासही झोप येत नाही. माझी अवस्था खूप वाईट आहे

Updated: Jul 20, 2022, 06:56 PM IST
राखीने केला गंभीर आरोप ,म्हणते माझं आयुष्य झालं बरबाद.. title=

ड्रामा क्वीन राखी सावंत कधी  चर्चेत असते ते तिच्या  विचित्र पेहरावासाठी तर कधी बेताल वक्तव्यांसाठी. अलीकडे राखी अशाच काही कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. राखीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी पापाराझींसमोर आपली व्यथा मांडताना  असे काही बोलताना दिसत आहे, जे ऐकून लोक हैराण झाले आहेत.

राखीने काय केला आरोप 

ती सांगितेय की ती खूप अडचणीत आहे आणि याचे कारण 'मोदी जी' आहेत.वास्तविक, राखी सावंतला अलीकडेच विमानतळावर स्पॉट केले. यादरम्यान राखी कारमधून खाली उतरताच तिचा चेहरा पडलेला दिसला. राखी एकदम हादरलेली दिसत आहे. गाडीतून उतरताच ती म्हणते- 'मोदीजींनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मी दोन रात्री झोपले नाही. बूस्टर डोस दिल्यानंतर मला झोप येत नाही.
राखी म्हणते, 'हृदय धडधडत आहे. माझे संपूर्ण शरीर वेगवेगळ्या गोष्टींसाठी काय मागत आहे हे मला माहित नाही. मी अस्वस्थ आहे. शरीरात काय चालले आहे ते मला कळत नाही. माझा चेहरा सुजलेला दिसतोय. मला झोप येत नाही. अर्धा तासही झोप येत नाही. माझी अवस्था खूप वाईट आहे. मला असे वाटते की हे बूस्टर इंजेक्शन 60, 70, 80, 90 वर्षांच्या लोकांना दिले पाहिजे. जे उठू शकत नाही.