औरंगाबाद जलयुक्त शिवार कामातील गैरव्यवहार प्रकरणी चार जणांना निलंबित

 जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

Updated: Oct 13, 2018, 06:53 PM IST
औरंगाबाद जलयुक्त शिवार कामातील गैरव्यवहार प्रकरणी चार जणांना निलंबित title=

औरंगाबाद : बातमी झी 24 तासच्या इम्पँक्टची. जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद जिल्हा जलसंधारण अधिकारी पदावर असलेले राजेंद्र काळे यांची आता या प्रकऱणात बदली करण्यात आलीय. याशिवाय गंगापूर आणि खुल्ताबादच्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांसह एकूण चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

या योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, खुल्ताबाद या तालुक्यात बोगस कामं झाली असल्याचा हा प्रकार झी मीडियाने उघड केला होता. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच कारवाईचे आदेश दिलेत.