धक्कादायक! 60 रुपयांसाठी जीवावर उठला, तरुणाची चाकू भोसकून हत्या

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात युवकाची हत्या करण्यात आली.

Updated: Mar 3, 2021, 03:41 PM IST
धक्कादायक! 60 रुपयांसाठी जीवावर उठला, तरुणाची चाकू भोसकून हत्या title=

चंद्रपूर: पैशांवरून वाद होत असल्याच्या अनेक वाद होत असतात. पण चक्क 60 रुपयांच्या जुन्या वादातून एका युवकानं तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात युवकाची हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री धारदार शस्त्रांनी युवकाने चाकूनं सापसप वार केले. तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हत्येमागे केवळ 60 रुपयांसाठी जुन्या उधार पैशाचा वाद असल्याची माहिती मिळाली आहे. बाबुपेठ वॉर्डातल्या तुकाराम महाराज चौकात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 26 वर्षीय सोनू चांदेकर असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनू रात्री जेवण झाल्यावर तुकाराम महाराज चौकात फिरायला आला होता. तिथेच त्याला 20 वर्षीय आरोप पवननं गाठलं. दोघांमध्ये बाचाबाची झाले. जुना वाद पुन्हा उफाळून आला. 

संतापाच्या भरात आरोपी पवननं धारधार चाकूनं सोनूवर वार केले आणि तिथून फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच तातडीनं त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपीला 60 किलोमीटर दूर असलेल्या एका गावातून ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.