नागपूर: नागपुरात हत्यासत्र सुरुच आहे. एका तरुणाची ‘फ्रेंडशि डे’ला तरुणीवरून झालेल्या वादातून हत्येची घटना घडली आहे.अनिकेत भोतमांगे( वय -21) असं मयत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री अनिकेतला मित्राने धारदार शस्त्रांनी संपवत मित्रत्वाला काळीमा फासली.नंदनवन पोलिस ठाणे हद्दीत हिवरीनगर एनआटी गार्डमध्ये हत्येचा हा थरार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
अनिकेत गड्डीगोदाम परिसरात वास्तव्यास आहे.रविवारी फ्रेण्डशिप डे असल्यामुळे अनिकेतसह त्याच्या मित्रांनी मित्रत्वाचा हा दिवस साजरा करण्याकरिता फिरायला जाण्याची योजना आखली. अनिकेत, वैभव व त्याचे मित्र फिरायला गेले. यादरम्यान अनिकेत आणि वैभव यांच्यात एका तरुणीवरून वाद झाला.त्यानंतर वैभव अनिकेत याचा काटा काढण्यासाठी षडयंत्र रचत होता. मंगळवारी रात्री अनिकेत, रोहण, अभिषेक व समीर हे चौघे हिवरीनगर परिसरात आले.तिथे ते पार्टी करत होते. यादरम्यान वैभव व त्याचे साथीदारही तेथे आले. वैभवने अनिकेतसोबत वाद घातला. यावेळी, वैभव व त्याच्या साथीदारांनी गुप्तीने अनिकेतवर सपासप वार केले व त्यानंतर ते तिथून पसार झाले.गभीर जखमी अनिकेतला इतर मित्रांनी तातडीनं रुग्णालयात नेले. मात्र मध्यरात्री डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हिवरीनगर गार्डनमेध्ये हत्येची ही घटना घडली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी मुख्य आरोपी वैभव बांगडे, सुमित ऊर्फ भोला वाघमारे, शोएब व नचिकेत पवार या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे.