पुण्यात तरुणीच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

पुण्यात  तरुणीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.  

Updated: Dec 5, 2019, 11:11 PM IST
पुण्यात तरुणीच्या खूनप्रकरणी तिघांना अटक title=

पुणे : एका तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मात्र, ही आत्महत्या असल्याचे सुरुवातील सांगण्यात येत होते. परंतु ती आत्महत्या नव्हे तर तिचा खून करण्यात आल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. खूनाची घटना सिंहगड रोडवरील माणिक बाग परिसरात घडली होती. ही तरुणी एमबीए पदवीधारक होती. ती कुटुंबीयांसोबत राहत होती. गेल्या आठवड्यात तिचे कुटुंबीय मूळ गावी बीडला गेले होते. तरुणीचा इंटरव्यू असल्याने ती एकटीच पुण्यात परतली होती. 

पुण्यातील तेजसा पायाळ खून प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. तरुणांची बदलती जीवनशैली, फसव्या ग्लॅमरच आकर्षण यातून तेजसाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. पियुष संचेती, वसंतकुमार गौडा आणि सोनल सदरे अशी या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

घटना घडली त्या रात्री  तेजसासह सगळे सोबत होते, त्यांनी एकत्रित पार्टी केली होती. सोमवारी दुपारी तेजसाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह तिच्या घरी आढळून आला होता. या घटनेशी ओळखीतल्या लोकांचा संबंध असावा असा संशय पोलिसांना सुरुवातीपासून होता. घटना उघडकीस आली तेव्हा तेजसाच्या घरात दारूच्या बाटल्या तसेच हुक्का पात्र आढळून आले. घटना घडली त्या रात्री तिने मित्रांसोबत पार्टी केली हिती.

या मित्रांचीही ओळख एका पार्टीतच झाली होती. तेजसा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. स्वतःचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर टाकायची. पार्टी करणे असो वा सोशल मीडिया याचे तिला आकर्षण होते. या ग्लॅमरच्या विळख्यात अडकल्यामुळे तिचा घात झाला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

तेजसाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी तिची हत्या झाली की तिने आत्महत्या केली याबाबत पोलिसांना साशंकता आहे. न्यायालयाने तिघांना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी तसेच संबंधितांची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.