पुणे : ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यवतमाळमध्ये होणाऱ्या आगामी ९२व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी अरूणा ढेरे यांची निवड झाली आहे.
११ ते १३ जानेवारी २०१९ यादरम्यान यवतमाळमध्ये हे संमेलन होणार आहे.
बऱ्याच काळानंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध झाली आहे. पाचव्यांदा अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेची निवड झाली आहे.
यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड होणार याविषयी बरीच उत्सुकता पाहायला मिळाली होती.
घटनादुरुस्तीनंतर बिनविरोध अध्यक्षपदासाठीची निवड करण्याचा निर्णय घ्यायचा असल्यामुळे साऱ्यांचच लक्ष या निर्णयाकडे लागलं होतं. तीन दिवसांच्या विचारमंथनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ साहित्यिका, लोकसाहित्याच्या अभ्यासक, ललित लेखन, वृत्तपत्रांसाठीचं स्तंभलेखन या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा नावलौकिक आहे.