सून मानसिक रुग्ण, घरात वाद झाला; संतापाच्या भरात तिने थेट सासूलाच संपवले

Nagpur News Today: नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरातील एका सुनेने ८० वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 3, 2023, 05:09 PM IST
 सून मानसिक रुग्ण, घरात वाद झाला; संतापाच्या भरात तिने थेट सासूलाच संपवले title=
women killed mother in law with the help of knief in nagpur

Nagpur Crime News: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनेनच कौटुंबिक वादातून आपल्या सासूची हत्या केली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Nagpur Police) सुनेला अटक केली आहे. (Women Killed Mother In Law)

नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक (नागोबा- मंदिर,जवळ) एका सुनेने ८० वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी महिलेचे नाव आहे.

आज 2 सप्टेंबर 2023 रोजी सासू ताराबाई आणि सून पुनम यांच्याच कौटुंबिक कारणाने वादावादी झाली होती. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या सुनेने ताराबाईंवर चाकूने हल्ला केला. वर्मावर घाव बसल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळं ताराबाई यांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे.

सून पूनमही मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे तिच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मानसोपरचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. मात्र, पूनम उपचार घेण्यासाठी टाळाटाळ करायची. गेल्या अनेक दिवसांपासून तिने औषधे घेतली नव्हती. शनिवारीही एका क्षुल्लक गोष्टीवरुन सासुसोबत तिचे वाद झाले होते. त्याच रागाच्या भरात तिने चाकुने सासू ताराबाई यांच्या गळ्यावर सपासप वार केले. 

सुनेने हल्ला केला असता ताराबाई यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज एकून शेजाऱ्यांनी त्यांच्या मुलाला याबाबत माहिती दिली. मुलगा घरी आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ताराबाई यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुनमला ताब्यात घेतले आहे.