शिंदवणे घाटात महिलेवर सामूहिक बलात्कार

जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात शुक्रवारी मध्यरात्री एका महिलेवर सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. फॉर्च्यूनर गाडीमध्ये महिलेवर बलात्कार करून आरोपींनी महिलेला घाटात सोडून दिले. 

Updated: Jun 17, 2017, 12:19 PM IST
शिंदवणे घाटात महिलेवर सामूहिक बलात्कार title=

जेजुरी : जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात शुक्रवारी मध्यरात्री एका महिलेवर सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. फॉर्च्यूनर गाडीमध्ये महिलेवर बलात्कार करून आरोपींनी महिलेला घाटात सोडून दिले. 

त्यानंतर महिलेनं घाटातल्या दोन दुचाकीस्वार प्रवाशांच्या मदतीनं आरोपींच्या गाडीचा नंबर मिळवला. तसंच लोणी काळभोर पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केलीय. 

पोलीस पुढील तपास करतायत. दरम्यान पीडित महिला केडगाव परिसरातली असून देवदर्शनासाठी नारायणपूरला गेली होती. तिथून परतायला उशीर झाल्यानं ती पारगाव चौफुली येथे उभी होती. 

यावेळी तिथे फॉर्च्यूनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटात नेऊन महिलेवर बलात्कार केला.