नाशिक : 'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमाची सध्या देशभर चर्चा आहे. या चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच चांगलीच कमाई केली असन 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
राज्यातही काश्मिर फाईल्स सिनेमा पहाण्यासाठी गर्दी होत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये 'द काश्मिर फाईल्स' सिनेमादरम्यान गोंधळ झाला आहे. 'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या महिलांना भगवी शाल घालून आल्याने अडवण्यात आलं.
नाशिक कॉलेज रोड इथल्या पीव्हीआर चित्रपटगृहात 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाचा शो होता. काही महिला हा सिनेमा पहाण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एका महिलेचांच्या खांद्यावर भगवी शाल होती. याला थिएटरच्या सिक्युरीटीने आक्षेप घेत प्रवेश नाकारला. या महिलेला भगवी शाल काढायला लावली.
त्यानंतर महिलांनी सिनेमागृहात जाऊन गोंधळ घातला, भगवी शाल द्या त्याशिवाय चित्रपटगृहातून बाहेर पडणार नाही अशी भूमिका घेत महिलांना जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला.