FBफ्रेंडवर विश्वास ठेवला, कामाच्या शोधात नागपुरात येताच आयुष्य उद्ध्वस्त झालं

Nagpur Rape Case: नागपूरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रावर विश्वास ठेवणे एका महिलेला महागात पडलं आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 29, 2023, 04:59 PM IST
FBफ्रेंडवर विश्वास ठेवला, कामाच्या शोधात नागपुरात येताच आयुष्य उद्ध्वस्त झालं title=
woman from mp gangraped in nagpur two accused held

Nagpur Crime News:  राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) आलेल्या विवाहित महिलेवर तिच्याच ओळखीच्या व्यक्तींनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीताबर्डी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. (Two Man Raped On Women)

महिलेला नागपुरात बोलवून घेतले

पिंटु गजभिये, कार्तिक चौधरी अशी दोन आरोपींची नावे आहे. महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिला मुळची मध्यप्रदेशातील आहे. गजभिये आणि तिची फेसबुकवर ओळख झाली. तेव्हा काम मिळवून देतो, असा बहाणा करत त्याने तिला नागपुरात येण्यास सांगितले. कामाच्या शोधात असलेल्या महिलेने त्याचे म्हणणं मान्य करत नागपुरात आली.

मध्यप्रदेशातून नागपुरात आल्यानंतर बस स्टँडवर घेण्यासाठी गजभिये आला होता. बाईकवरुन तिला एके ठिकाणी घेऊन जात असतानाच एका ठिकाणी थांबवून बाइक थांबवून तिला खाली उतरण्यास सांगितले. थोड्यावेळाने एक कार तिथे आले. त्याने तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर ते नागपूर ग्रामीण येथील सावनेरमध्ये गेले. 

आधीच रचला होता प्लान

गजभिये आणि त्याच्या मित्रांनी आधीच एक लॉज बुक करुन ठेवले होते. त्यामुळं त्यांच्या प्लाननुसार ते तिला लॉजवर घेऊन गेले. तिथे तिच्या पेयात गुंगीचे औषध मिसळले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी तिला गाडीत बसवले व एका निर्जनस्थळी नेऊन सोडले. 

महिलेने तिथे असलेल्या स्थानिकांच्या मदतीने पोलिस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली. सक्कारदरा पोलिसांनी लगेचच सीताबर्डी पोलिसांशी संपर्क साधत घडलेली घटना सांगितली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. 

पाच तासांत केली अटक

सीताबर्डी पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोघांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पीडित महिलाही 34 वर्षीय असून दोन मुलांची आहे. पीडिता आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. साधारण तीन वर्षांपूर्वी तिची ओळख आरोपीशी झाली होती. 

बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

पांगरी येथे एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार अत्याचार झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकारानंतर पीडित मुलगी आणि तिचे आई वडील गावातूनच गायब असल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करत न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.