बिंदुसरा नदीच्या पूरात महिला वाहून गेली

बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय.

Updated: Aug 27, 2017, 11:20 PM IST
 बिंदुसरा नदीच्या पूरात महिला वाहून गेली title=

बीड : बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय. मांजरसुबा, पाली, कोळगाव, कपिलधार या भागात मुसळधार पाऊस झाल्यानं नदीला पूर आलाय. आष्टी तालुक्यातील देवळाली पानांची गावात पूराचं पाणी शिरलंय. यामुळे गावातल्या अनेकांचं स्थलांतर करण्यात आलंय. 

पूरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय. बेलखंडी पाटोदा इथली एक महिला बिंदुसरा नदीच्या पूरात वाहून गेली. अन्नपूर्णा माने नावाची ही महिला शेतातून परतत असताना पूरात वाहून गेलीय. डोकेवाडा साठवण तलाव ओव्हरफलो झालाय. बिंदुसरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु झाल्यानं धरण ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे.