भंडारा : राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा आणि गोंदियातील जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील काही जागा, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज सकाळपासून जाहीर होत आहेत. भाजपने सर्वाधिक जागा जिंकून पहिला नंबर पटकावला आहे. मात्र....
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एक विधान प्रकर्षाने गाजले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. नव्हे, त्यावरून भाजपने राज्यात आंदोलन केले. पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केले. ते विधान म्हणजे. 'म्हणून मी मोदींना मारू शकतो, त्यांना शिव्या घालू शकतो. मात्र...
ज्या गावात पटोले यांनी हे विधान केले ते गाव म्हणजे पालांदूर जिल्हा परिषद मतदार संघातील जेवनाळा... सुकळी या नाना पाटोळेंच्या गावाशेजारचं हे गाव. जेवनाळा गावात नाना गेले. तथाकथित वादग्रस्त विधान केलं. तिथे नेमकं काय झालं, कोण जिंकलं, कोण हरलं हे प्रश्न समोर येत होते. अखेर... या मतदार संघाचा निकाल हाती आला आहे.
नानांच्या विधानाने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे ही जागा जिंकणं काँग्रेससाठी महत्वाचं होतं. ही जागा जिंकून काँग्रेसला एक प्रकारे दिलासा मिळणार होता आणि झालंही तसंच.. या मतदार संघातून काँग्रेसच्या सरिता कापसे विजयी झाल्या आहेत.