मास्कपासून कधी होणार सुटका? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं उत्तर

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. ते पूर्णत्वास न्यायचे आहे.   

Updated: Mar 30, 2022, 12:43 PM IST
मास्कपासून कधी होणार सुटका? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं उत्तर title=

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आता सुधारत आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. ते पूर्णत्वास न्यायचे आहे. 

नागरिकांकडून कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या मागण्या होत हायेत. पण, मुख्यमंत्री आणि राज्य टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून रेल्वे, बस, मॉल्स अशा ठिकाणचे निर्बंध कमी केले आहेत.

गुढीपाडवा हा सण आपण घरे साजरा करतो. तरीही हा सण साजरा करण्यास परवानगी दिली आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ती ही मोठ्या उत्साहात साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळेच हे निर्णय घेण्यात येत आहेत. 

यामुळेच कोरोनाचे निर्बंध मोट्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. काही प्रमाणात हे निर्बंध कायम आहेत. मात्र, मास्क मुक्तीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. अन्य देशात अजूनही कोरोना पूर्णतः नियंत्रणात आलेला नाही. 

त्यामुळे जगभरात कोरोनाचे पूर्ण उच्चाटन होईल. तोपर्यंत तरी मास्कपासून मुक्ती मिळणार नाही. पण, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स याना योग्य वाटल्यास ते तसा निर्णय घेऊ शकतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.