'तू माझ्याशी लग्न कर', शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून युवतीनं संपवलं

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून महाविद्यालयातील विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं 

Updated: Jan 29, 2022, 09:01 PM IST
'तू माझ्याशी लग्न कर', शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून युवतीनं संपवलं title=

कोल्हापूर : आयुष्यात सर्वात जास्त मार्गदर्शन मिळते ते आपल्या शिक्षकांकडून मात्र महाविद्यालयात काहीसा विचित्र प्रकार घडला आहे. मात्र शिक्षकच महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या मागे लागला. नुसता मागे नाही तर सतत मेसेज करून त्रास देऊ लागला. लग्नासाठी तगादा लावू लागला त्यामुळे या तरुणीचं जगणं मुश्कील झालं. 

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून महाविद्यालयातील विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या अर्जुनवाडा इथे घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ही युवती 19 वर्षांची होती. लग्नासाठी शिक्षक सतत तगादा लावत होता. त्याच्या जाचाला कंटाळून तरुणीनं आयुष्य संपवलं आहे. 6 दिवसांपूर्वी तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?
19 वर्षाच्या युवतीला कधी फोन करून तर कधी सोशल मीडियाचा वापर करून सतत शिक्षक मेसेज करायचा. माझ्याशी लग्न कर असा सतत तगादा त्याने लावला होता. दीड महिन्यांपासून तो युवतीला सतत मेसेज पाठवायचा. तू फक्त हो म्हण, तू होकार दिलास तर मी बायको-मुलांना सोडून येईन. तुझ्यासोबत लग्न करेन पण तू लग्नासाठी होकार दे, असा मेसेज तो सतत पाठवायचा. 

सततच्या शिक्षकाच्या जाचाला कंटाळून युवतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. राहत्या घरीच तिने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या युवतीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.