उदगीर रेल्वे स्थानकावरील पत्र गळत असल्याने प्रवाशांची गैरसोय

पावसाची जोरदार हजेरी

Updated: Jun 24, 2019, 06:28 PM IST
उदगीर रेल्वे स्थानकावरील पत्र गळत असल्याने प्रवाशांची गैरसोय title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे काल मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उदगीर रेल्वे स्थानकाला अक्षरशः शॉवरचे स्वरूप आले होते. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकावरील पत्रे हे गळत असल्याने स्थानकात अक्षरशः पाण्याच्या शॉवर प्रमाणे पाणी रेल्वे स्थानकात पडत होते. परिणामी रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय झाली.

रेल्वे स्थानकावरील पत्रे मोठ्या संखेने गळके तर काही ठिकाणी फुटलेल्या अवस्थेतील असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन कधी या बाजुला तर कधी त्या बाजुला सरकावे लागत होते. यात महिला लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. सध्याला पावसाळ्याचे दिवस असल्याने स्थानकावरील पत्र्यांची दुरुस्ती करावी अशी मागणीही आता होऊ लागली आहे.