2 वर्षांत पूर्ण होणार पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; लोकलचा प्रवास वेगवान होणार

Virar-Dahanu Road Project: पश्चिम रेल्वेचा आता विरारच्या पुढेही विस्तार होत आहे. डहाणूपर्यंत लोकल सुरू झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने प्रकल्पाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 7, 2024, 10:08 AM IST
2 वर्षांत पूर्ण होणार पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; लोकलचा प्रवास वेगवान होणार title=
virar dahanu quadrupling line work to completed by december 2026

Mumbai News Today:  पश्चिम रेल्वेचा आता विरारच्या पुढे विस्तार होत आहे. डहाणूपर्यंत रेल्वेचा विस्तार झाल्यानंतर तिथले प्रॉपर्टीचे भावही वाढले आहेत. त्याचबरोबर तिथल्या लोकांचा प्रवास अधिक सुखाचा होण्यासाठी रेल्वे प्रशासन जोमाने काम करत आहे. विरार आणि डहाणू दरम्यान दोन रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 23 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि प्रकल्पाची प्रगती पाहून डिसेंबर 2026 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. मुंबई अर्बन प्रॉजेक्ट-3 (MUTP) अंतर्गंत 63 किलोमीटर लांबीचा विरार-डहाणू कॉरिडर चौपदरीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा एकूण खर्च 3,578 कोटी इतका लागण्याची शक्यता आहे. 

विरार-डहाणू स्थानकांदरम्यान दोन रूळ टाकण्यात येणार आहेत. मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावरील या दोन महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान काही वर्षांपूर्वीच उपनगरीय सेवा सुरू करण्यात आली होती. आता उपनगरीय सेवांचा विस्तार करावा लागणार असल्याने आणखी दोन ट्रॅक टाकावे लागणार आहेत. विरार-डहाणू या मार्गावर लोकल, मालगाड्या, पॅसेंजर गाड्या धावतात, मात्र दोनच ट्रॅक असल्याने त्याची क्षमता कमी आहे. मात्र, आणखी दोन रेल्वे रुळ टाकल्यानंतर बोरिवली ते विरार दरम्यान अधिक जलद लोकल धावू शकतात. लांब पल्ल्याच्या गाड्या चालवताना वेळेचीही बचत होणार आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) करत आहे.

विरार-डहाणू दरम्यान वैतरणा नदीवर आणखी एक रेल्वे पुल तयार केला जाणार आहे. जवळपास 600 मीटर लांबीचा पुलासाठीचे काम सुरु करण्यात येत आहे. या सेक्शनमध्ये दोन मोठे पुल, 16 मेजर ब्रिज आणि 67 मायनर ब्रिज बनवण्यात येणार आहे. यातील 60 पुल आणि रेल अंडर ब्रिजचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विरार-वैतरणा स्टेशनवर स्टेशन बिल्डिंग, सर्व्हिस बिल्डिंग, स्टाफ क्वॉर्टर आणि प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम सुरू आहे. त्याचपद्धतीने सफाळे, केळवे रोड, डहाणू रोड आणि उमरोलीवर नवीन सर्व्हिस इमारतींचे काम करण्यात येत आहे. 

प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये

प्रकल्पासाठी 3,578 एकूण खर्च येणार आहे.तर, आत्तापर्यंत 825 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 23 टक्क्यांपर्यंत प्रकल्पाचे काम पू्र्ण झाले आहे. 2026 डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.