Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...

Maharashtra Vidhansabha AI Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातील राजकारणात सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील सविस्तर टक्केवारी एआय सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 16, 2024, 06:10 PM IST
Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं... title=
Vidhansabha Election 2024 AI Survey AI Anchor ZEENIA reveals about government formation in state

Maharashtra Vidhansabha AI Survey : अतिशय झपाट्यानं पुढे जाणाऱ्या या आधुनिक युगामध्ये सध्या AI ची चलती असून, या तंत्रज्ञानाची जोड देत वृत्तमाध्यमात झी समुहानंही AI अँकरची मदत घेत एक पाऊल पुढे टाकलं. देशातील राजकारणात सध्या घडणाऱ्या घडामोडी आणि या घडामोडींच्या आधारे मतदारांच्या बदलणाऱ्या भूमिका या साऱ्यांचा आधार घेत मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासातील पहिली AI अँकर झीनियानं नुकताच Maharashtra Vidhansabha AI Survey सादर केला. 

झीनियानं यावेळी सर्व्हेक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण 24 प्रश्नांचा आधार घेत राज्यात आताच्या क्षणाला विधानसभा निवडणूक घेतल्यास त्याचा निकाल नेमका कोणात्या बाजूनं जाईल आणि मतदारांचा एकूण कल कुठं असेल, कोणते घटक निवडणुकीवर परिणाम करु शकतील याविशयीची माहिती सादर केली. AI अँकर झीनियानं सादर केलेला सर्व्हे आणि त्यातील काहीसा भुवया उंचावणारा निकाल आता विधानसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? या प्रश्नाच्या उत्तरातून समोर आला. 

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता वाटते? 

भाजप - 38 टक्के
शिवसेना शिंदे गट - 22 टक्के
शिवसेना ठाकरे गट - 17 टक्के 
काँग्रेस - 14 
एनसीपी शरद पवार गट - 9 

आज निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? 

महायुती - 47 टक्के 
मविआ- 39 टक्के 
इतर - 14 टक्के 

महाराष्ट्रात ओवैसी, वंचित, मनसे किंवा तिसरी आघाडी प्रभावी ठरेल का? 

हो - 60 टक्के 
नाही - 30 टक्के 
सांगता येत नाही- 10 टक्के 

हेसुद्धा वाचा : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर, झीनिया सादर करणार महाराष्ट्र विधानसभेचा पहिला महा AI सर्व्हे... झी 24 तासवर

 

AI अँकर ZEENIA नं सादर केलेल्या या सर्व्हेमध्ये आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला असून डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन ही आकडेवारी मिळवण्यात आली आहे. राज्यातील एकूण 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात  महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे यांचा अंदाज बांधण्यात आला आहे. हा सर्व्हेचा पहिला भाग असून, येत्या काळात दुसरा भागही सादर केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वीही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान झीनियानं असाच एक AI सर्व्हे सादर करत महत्त्वपूर्ण आकडेवारी सादर केली होती. त्यावेळी बांधण्याच आलेले अंदाज बहुतांशी योग्य ठरले असून, लोकसभेचे निकालही त्याच धर्तीवर लागले. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये आणि झीनियानं सादर केलेल्या या एआय सर्व्हेच्या आकडेवारीमध्ये किती साधर्म्य आढळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

(डिस्क्लेमर- वरील माहिती ही 'झी 24 तास'ने महाराष्ट्राच्या 288 मतदार संघात जाऊन केलेलं सर्व्हेक्षण आहे. हा कोणत्याही प्रकारचा निकाल नसून जनमताचा कौल आहे.)