व्हिडिओ : बुद्ध - स्तूप थीमवर उभारलेलं हे एअरपोर्ट मेट्रो स्टेशन

न्यू एअरपोर्ट स्थानकावर सुंदर अशी बुद्ध मूर्ती मुख्य आकर्षण असणार आहे. या स्थानकावर तयार करण्यात आलेला स्तूपही देखणा आहे. 

Updated: Apr 26, 2018, 06:17 AM IST
 title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर मेट्रो स्थानकं अतिशय देखणी होणार आहेत. प्रत्येक मेट्रो स्थानकाला आगळा वेगळा आणि एका विशिष्ट थीमनुसार लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. खापरी आणि एअरपोर्ट साऊथ या दोन  मेट्रो स्टेशनच्या दरम्यानचं हे न्यू एअरपोर्ट मेट्रो स्थानक... या स्थानकाची रचना बुद्ध आणि स्तूप या थीमवर करण्यात आलीय. न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्थानकावर वापरण्यात आलेले सँड-स्टोन राजस्थानच्या धोलपूरमधून आणण्यात आलेत. त्यामुळे स्थानकही चकचकीत आणि उठून दिसतंय... त्याचबरोबर या सँडस्टोन्समुळे वातावरणही थंड राहणार आहे, अशी माहिती नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक अनिलकुमार कोकाटे यांनी दिलीय. 

न्यू एअरपोर्ट स्थानकावर सुंदर अशी बुद्ध मूर्ती मुख्य आकर्षण असणार आहे. या स्थानकावर तयार करण्यात आलेला स्तूपही देखणा आहे. 

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे न्यू एअरपोर्ट स्थानक ओळखलं जाणार आहे... एकंदरीतच नागपूर मेट्रोचं काम वेगात सुरू आहेच, पण त्याचबरोबर ही मेट्रो स्टेशन्स देखणी कशी होतील, यासाठीही आवर्जून प्रयत्न केले जात आहेत.