निकाल महाराष्ट्राचा : विदर्भाच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.

Updated: Oct 25, 2019, 03:05 PM IST
निकाल महाराष्ट्राचा : विदर्भाच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का title=

नागपूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला त्यांचा बालेकिल्ला असेलल्या विदर्भामध्य़े मात्र धक्का बसला आहे. विदर्भातल्या एकूण ६२ जागांपैकी २८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे, तर शिवसेनेने ४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने विदर्भात १५ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात ६ जागांवर विजय मिळवला. तर बच्चू कडूंच्या प्रहारने २ जागा पटकावल्या. बडनेऱ्यामधून आघाडीचे पुरस्कृत रवी राणा जिंकले आहेत. मोर्शीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांचाही विजय झाला आहे. तर विदर्भातून ४ अपक्ष निवडणूक जिंकले आहेत.

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवार

विदर्भाची आकडेवारी

मलकापूर- राजेश एकडे- काँग्रेस- विजयी
बुलडाणा- संजय गायकवाड- शिवसेना- विजयी
चिखली- श्वेता महाले- भाजप- विजयी
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे- राष्ट्रवादी- विजयी
मेहकर- संजय रायमुलकर- शिवसेना- विजयी
खामगाव- आकाश फुंडकर- भाजप- विजयी
जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे- भाजप- विजयी
अकोट- प्रकाश भारसाकळे- भाजप- विजयी
बाळापूर- नितीन देशमुख- शिवसेना- विजयी
अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा- भाजप- विजयी
अकोला पूर्व- रणधीर सावरकर- भाजप- विजयी
मूर्तिजापूर- हरीश पिंपळे- भाजप- विजयी
रिसोड- अमित झनक- काँग्रेस-विजयी
वाशिम- लखन मलीक- भाजप- विजयी
कारंजा- राजेंद्र पाटणी- भाजप- विजयी
धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड- भाजप- विजयी
बडनेरा- रवी राणा- महाआघाडी समर्थन- विजयी
अमरावती- सुलभा खोडके- काँग्रेस- विजयी
तिवसा- यशोमती ठाकूर- काँग्रेस- विजयी
दर्यापूर- बळवंत वानखेडे- काँग्रेस- विजयी
मेळघाट- राजकुमार पटेल- प्रहार- विजयी
अचलपूर- बच्चू कडू- प्रहार- विजयी
मोर्शी- देवेंद्र भुयार- स्वाभीमानी शेतकरी संघटना- विजयी
आर्वी- दादाराव केचे- भाजप-विजयी
देवळी- रणजीत कांबळे- काँग्रेस- विजयी
हिंगणघाट- समीर कुनावार- भाजप- विजयी
वर्धा- पंकज भोयर-भाजप- विजयी
काटोल- अनिल देशमुख- राष्ट्रवादी- विजयी
सावनेर- सुनील केदार- काँग्रेस- विजयी
हिंगणा- समीर मेघे- भाजप- विजयी
उमरेड- राजू पारवे- काँग्रेस- विजयी
नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप-विजयी
नागपूर दक्षिण- मोहन मते- भाजप- विजयी
नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे-भाजप- विजयी
नागपूर मध्य- विकास कुंभारे- भाजप- विजयी
नागपूर पश्चिम- विकास ठाकरे-काँग्रेस- विजयी
नागपूर उत्तर- नितीन राऊत- काँग्रेस- विजयी
कामठी- टेकचंद सावरकर- भाजप- विजयी
रामटेक- आशिष जयस्वाल- अपक्ष- विजयी
तुमसर- राजू कारेमोरे- राष्ट्रवादी- विजयी
भंडारा- नरेंद्र भोंडेकर- अपक्ष- विजयी
साकोली- नाना पटोले- काँग्रेस- विजयी
अर्जुनी-मोरगाव- मनोहर चंद्रीकापुरे- राष्ट्रवादी- विजयी
तिरोडा- विजय रहांगदळे- भाजप- विजयी
गोंदिया- विनोद अग्रवाल- अपक्ष- विजयी
आमगाव- सहसराम कोराटे- काँग्रेस- विजयी
आरमोरी- कृष्णा गजभे- भाजप- विजयी
गडचिरोली- देवराव होली- भाजप- विजयी
अहेरी- धर्मरावबाबा अत्राम- राष्ट्रवादी- विजयी
राजुरा- सुभाष धोटे- काँग्रेस- विजयी
चंद्रपूर- किशोर जोरगेवार- अपक्ष- विजयी
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार- भाजप- विजयी
ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार- काँग्रेस- विजयी
चिमूर- बंटी भंगडिया- भाजप- विजयी
वरोरा- प्रतिभा धानोरकर- काँग्रेस- विजयी
वणी-संजीव बोदकुरवार- भाजप- विजयी
राळेगाव- अशोक उईके- भाजप- विजयी
यवतमाळ- मदन येरावार- भाजप- विजयी
दिग्रस- संजय राठोड- शिवसेना- विजयी
आर्णी- संदीप धुर्वे- भाजप- विजयी
पुसद- इंद्रनिल नाईक- राष्ट्रवादी- विजयी
उमरखेड- नामदेव ससाणे- भाजप- विजयी