मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 12 वाजल्यापासून सायन ब्रीजवरची सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद

आज मध्यरात्रीपासून सायन उड्डाणपूल बंद केला जाणार आहे.  जीर्ण झाल्याने हा पूल पाडला जाणार आहे. याचा मुंबईतल्या रस्ते वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 31, 2024, 08:03 PM IST
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 12 वाजल्यापासून सायन ब्रीजवरची सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद  title=

Sion Railway Bridge : आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल बंद होत आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणाराय. हा पूल ब्रिटिशकालीन 112 वर्षं जूना असल्यानं, तो जीर्ण झालाय. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरुन हा उड्डाणपूल पाडण्यात येणार असून, त्या जागी नवीन पूल बांधला जाईल. जुलै 2026पर्यंत नवीन पुलाची बांधणी पूर्ण करण्याचं उदिष्ट आहे. दरम्यान सायन उड्डाणपूल बंद झाल्यानंतर, मुंबईतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.  

मध्य रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने  12/10-11 किमी अंतरावरील शीव रेल्वे स्थानकाजवळ सध्याच्या आरओबीच्या जागी नवीन आरओबी बांधला जाणार आहे.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये आरओबी हटवण्याची आणि स्टील गर्डर्स आणि आरसीसी स्लॅबसह नवीन आरओबी पुन्हा बांधण्याची शिफारस केली होती. याशिवाय शीव आरओबी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रस्तावित संरेखनाचे उल्लंघन करत आहे. 

पुनर्बांधणीच्या कामादरम्यान जनतेला विद्यमान शीव आरओबीच्या दोन्ही बाजूला असलेले पर्यायी सार्वजनिक पादचारी पूलाचा (एफओबी) वापर करता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   सार्वजनिक एफओबी (धारावी धोबीघाट एफओबी) शीव रुग्णालयाच्या (दक्षिण) दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर.  शीव स्टेशनच्या कुर्ला (उत्तर) टोकाला सार्वजनिक एफओबी सुमारे 350 मीटर अंतरावर.