ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं बुधवारी सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते. डावखरे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील राजकारणातला एक वजदार नेत काळाच्या पडद्याआड गेलाय. आज दुपारी ३.०० वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
ते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक होते. ते राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये असले तरी राजकारणात 'अजातशत्रू' अशी त्यांची ओळख होती. शरद पवारांप्रमाणे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशीही त्यांचा स्नेह होता.
शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचाराची सुरुवात ते दिघे यांच्या टेंभी नाका येथील स्मृतीस अभिवादन करून करायचे... शिवसेनेचा उमेदवार विरोधात असायचा तरी डावखरेंचा प्रचार तिथूनच सुरू व्हायचा.
डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला असल्याची भावना, यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
Saddened to know about the demise of Former Deputy Chairman of Maharashtra Legislative Council Shri Vasant Davkhare ji.
My deepest condolences to his family, friends and followers.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 4, 2018
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनाने एक अजातशत्रू नेता आपल्यातून निघून गेला. त्यांच्या परीवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/QZRk0JPZQm— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 4, 2018
मा. वसंत डावखरे साहेबांच्या निधनाने एक जेष्ठ नेतृत्व, मार्गदर्शक हरपले आहेत . विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून 18 वर्ष काम करतांना त्यांनी त्या पदाला एका उंचीवर नेले. राजकारणापलीकडील मैत्री असो की विविध क्षेत्रातील काम त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली ! pic.twitter.com/RCMSVKn49a
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 5, 2018
Sad about demise of ex Dy Chairman,Maharashtra Legislative Council,Vasant Davkhare ji My deepest condolences to family, friends&followers.
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) January 5, 2018
My heartfelt condolences to the sad demise of Ex-Deputy Chairman of Vidhan Parishad, Maharashtra State, #VasantDavkhare ji. May his soul Rest in peace. pic.twitter.com/73aRDrPr3D
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) January 4, 2018
The sad demise of Late Vasant Davkhare has caused a great loss to Maharashtra as he was a leader who was dedicated to strengthening the institution of democracy and legislature pic.twitter.com/73A2RGkm98
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) January 5, 2018