वाजपेयी श्रद्धांजलीला विरोध, MIM नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी लाथा-बुक्क्यांनी बदडले

औरंगाबाद महानगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजपच्या नगरसेवकांनी MIM च्या नगरसेवकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

Updated: Aug 17, 2018, 07:43 PM IST
वाजपेयी श्रद्धांजलीला विरोध, MIM नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी लाथा-बुक्क्यांनी बदडले title=

औरंगाबाद  : येथील महानगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. आज शुक्रवारी दुपारी विशेष सभेत ही घटना घडली. महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरुन सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच्या सभेला एमआयएमच्या नगरसेवकाने विरोध केला. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी MIM च्या नगरसेवकाला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. 

एमआयएमचे नगरसेवकाने वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाला विरोध दर्शवला. त्यानंतर संतप्त भाजप नगरसेवकांनी सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली. भरसभागृहात ही मारहाण झाली.  समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली. त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा विरोध केला. 
 
दरम्यान, भाजपच्या काही नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केल्याचे पडसाद लगेच उमटले आहेत. एमआयएम नगरसेवक समर्थकांनी औरंगाबाद महानगरपालिका परिसरात दगडफेक केली. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजप संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आलेय.

 
तर दुसरीकडे एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्त प्रसाद यांची भेट घेतली.