यवतमाळ : दारू तस्करीसाठी लक्झरी ट्रॅव्हल बसचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निखिल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या ट्रॅव्हल बसमधून पोलिसांनी तस्करांना मुद्देमालासह अटक केली. यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील जुन्या बायपास जवळ ही ट्रॅव्हल्स थांबवून त्यात एका कारमधून दारू उतरवत होते 50 देशी दारू च्या पेट्या, व विदेशी मद्याच्या पेट्या असा 1 लाख रुपयांवर अवैध दारू साठा आढळला. पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
यवतमाळ जिल्ह्यालगतच्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या दारूबंदीमुळे आता चक्क लक्झरी ट्रॅव्हल्स बसमधून दारू तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ शहर पोलिसांनी पकडलेली ही दारू चक्क लक्झरी बस मध्ये आढळली आहे. एका डस्टर कारमधून ट्रॅव्हल्समध्ये दारू उतरविल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने छापा मारला असता दारू तस्करीच्या या आयडियामुळे पोलिसही चक्रावले.
निखिल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या ट्रॅव्हल बसमधून पोलिसांनी तस्करांना मुद्देमालासह अटक केली. शहर पोलिसांनी छापा मारला असता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दारू तस्कर ललित गजभिये याने पोलिसांसोबत बाचाबाची करून हुज्जत घातली आणि रेटारेटी करून डस्टर कार घेऊन तस्कर पळून गेले. तर अॅक्टिव्हाने पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या ललित गजभिये आणि कपिल राऊत या आरोपींना पोलिसांनी पकडले. या ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता त्यातून १ लाख ७० हजार रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी या दारू साठ्यासह, एक अॅक्टिव्हा आणि 40 लाख रुपयांची लक्झरी बस जप्त केली आहे.