विशाल करोळे, औरंगाबाद : हर्सूल कारागृहात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. त्या उपक्रमाच नाव होत 'गळाभेट'. या गळाभेट उपक्रमामध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अनेक वर्षांनी आपल्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटता आले. या अनोख्या भेटीत शिक्षा भोगणारे कैदी आणि कुटुंबीय भावनिक झाले होते.
हर्सूल कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पहिल्यांदाचं जेलमध्येच आपल्या कुटुंबियांना भेटता आलं. बऱ्याच वर्षांनी आपल्या कुटुंबियांना समोर पाहून कैदीही भावनिक झाले होते. आपली मुलांना भेटल्यानंतर कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. आणि आपल्या माणसाला भेटताना कुटुंबीय आणि कैदीचे डोळे पाणावले.
या अनोख्या उपक्रमामुळे कैद्याना वेगळाच आनंद मिळाला. दोन कैद्यानी तर आपल्या मुलांचे वाढदिवस देखील साजरे केले ते देखील आपल्या हाताने तयार केलेला केक कापून. हर्सूल कारागृहातील ७० कैद्याना आज आपल्या कुटुंबियांना भेटण्याचा आनंद मिळाला. लवकरच महिला बंदीसाठी योजना राबवण्यात येणार असल्याच कारागृह प्रशासनाच नियोजन आहे.
कारागृहात शिक्षा भागणारे कोणी खुनाची तर कोणी चोरीच्या किंवा इतर गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. बंदी जरी असले तरी माणूस म्हणून त्यांच्या कडे देखील मन असत. आपल कुटुंब सर्वाना हवहवस वाटत. आपल्या कुटुंबियांना भेटून गुन्हेगारी मानसिकेतेत बदल होऊन नव आयुष्य बंदी जगो हीच अपेक्षा.