'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 8, 2023, 04:29 PM IST
'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर title=

अहमदनगर : दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अहमदनगर (Ahamednagar) दौऱ्यावर आहेत. कोपरगावच्या काकडी गावात ठाकरेंनी शेतीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडल्या. त्यानंतर संगमनेरच्या वडझरी गावात शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली..त्यावेळी शेतकऱ्यांनी पाढाच वाचला. .शासन आपल्या दारी ही फसवी योजना असून, सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर मदत मिळते का वाट पाहू, नाहीतर आंदोलन करू असा इशारा ठाकरेंनी सरकारला दिलाय.

या सरकारकडे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत करा, शेतकऱ्यांचं वीजबिल सरकारने माफ करावं अशा मागण्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. 

उद्धव ठाकरेंचा नगर दौरा
सध्या राज्यातील अनेक भगत दुष्काळ सदृश्य  (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याच दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करत आहे. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे मातोश्रीहुन मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिथून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले.  वडजरी, केलवाड आणि कोऱ्हाले गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं आणि मुंबईकडे रवाना झाले. 

राधाकृष्ण विखे पाटलांची टीका
उद्धव ठाकरेंच्या दुष्काळ दौऱ्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी टीकास्त्र सोडलंय. ठाकरेंचे दौरे कुणीही गांभीर्यानं घेत नाही, अशी टीका त्यांनी केलीय. एक रुपयाता विम्याचा फायदा केवळ विमा कंपन्यांना होत असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं.