टोलनाक्यावरुन साताऱ्यात रात्री राडा, उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात रात्री तणाव निर्माण झाला होता. टोलनाक्याचं व्यवस्थापन बदलायचं नाही ही भूमिका खासदार उदयनराजे भोसलेंची होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले टोलनाका व्यवस्थापन बदलण्याची मागणी करत होते. याच मुद्दयावरुन तणाव निर्माण झाला होता.

Updated: Oct 6, 2017, 07:49 AM IST
टोलनाक्यावरुन साताऱ्यात रात्री राडा, उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने title=

सातारा : आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात रात्री तणाव निर्माण झाला होता. टोलनाक्याचं व्यवस्थापन बदलायचं नाही ही भूमिका खासदार उदयनराजे भोसलेंची होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले टोलनाका व्यवस्थापन बदलण्याची मागणी करत होते. याच मुद्दयावरुन तणाव निर्माण झाला होता.

मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली. टोल व्यवस्थापन बदललं जाणार असल्याचं समजल्यानंतर, स्थानिक कर्मचाऱ्यांना काढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन, संध्याकाळी ६ वाजल्यापासून खासदार उदयनराजे भोसलेंनी समर्थकांसह टोलनाका कार्यालयात ठिय्या मांडला होता. 

तर रात्री सव्वा अकराच्या सुमाराला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या समर्थकांसह आनेवाडी टोलनाक्‍याकडे येत होते. मात्र पोलिसांच्या विनंतीनंतर आमदार शिवेंद्रसिहंराजे आणि त्यांचे समर्थक पुन्हा साताऱ्याला परतले. 

दरम्यान टोलनाका व्यवस्थापन पुढले आदेश येईपर्यंत जैसे थे राहणार असल्याचं समजल्यावर, खासदार उदयनराजेही आपल्या समर्थकांसह टोलनाक्यावरुन साताऱ्याला परतले.