राष्ट्रवादीच्या 'हल्लाबोल'चा समारोप, उदयनराजे स्टेजवरून गायब

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात होतोय

Updated: Jun 10, 2018, 06:24 PM IST
राष्ट्रवादीच्या 'हल्लाबोल'चा समारोप, उदयनराजे स्टेजवरून गायब  title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवसही आजच आहे. त्यामुळे २० वा स्थापना दिवस तसेच हल्लाबोल आंदोलनाचा समारोप अशा दुहेरी औचित्यावर पक्षाचं शक्तीप्रदर्शन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह पक्षाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एवढच नाही तर नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले छगन भुजबळही या कार्यक्रमाला पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाला पोहोचले पण ते स्टेजवर आले नाहीत. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवरून गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.