गणपतीपुळेत दोन पर्यटक समुद्रात बुडाले, दोघांना वाचविण्यात यश

कोकणातल्या (Konkan) समुद्र किनारी पोहायला जात असाल तर सावधान.  

Updated: Dec 15, 2020, 08:59 PM IST
गणपतीपुळेत दोन पर्यटक समुद्रात बुडाले, दोघांना वाचविण्यात यश  title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : कोकणातल्या (Konkan) समुद्र किनारी पोहायला जात असाल तर सावधान. कारण समुद्रात पोहण्याचा आनंद तुमच्या अंगलट येवू शकतो. अशाच थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. गणपतीपुळे ( Ganpatipule) समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना (Two tourists) वाचवण्यात यश आले आहे. 

हे पर्यटक देवदर्शनानंतर समुद्रात अंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोन पर्यटक बुडू लागले.(Two tourists drowned in Ganpatipule) त्याचवेळी तिथे असणाऱ्या पाच जीवरक्षकांनी या दोन पर्यटकांचे प्राण वाचवले. आशिष माने, अक्षय माने, महेश देवरुखकर, अनिकेत राजवाडकर, प्रफुल्ल पाटील या जीवरक्षकांनी त्यांचे प्राण वाचवले.

गणपतीपुळे समुद्र किनारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आले तरी येथे कोणीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गणपतीपुळे जीवरक्षक टिमने या दोन बुडणाऱ्या पर्यटकांचे प्राण वाचवले. जीवावर उदार होवून या दोन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात आले. अनलाॅक झाल्यानंतर कोकणात मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी पर्यटक येत आहेत. त्यामुळे समुद्रात पोहोण्याचा आनंद घेताना पर्यटकांनी सुरक्षिततेची तेवढीत काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.