यवतमाळमध्ये भीषण अपघात

यवतमाळच्या उमरखेडजवळ एक भीषण अपघात झाला आहे. 

Updated: Nov 1, 2017, 01:13 PM IST
यवतमाळमध्ये भीषण अपघात title=

यवतमाळ : यवतमाळच्या उमरखेडजवळ एक भीषण अपघात झाला आहे. 

ट्रक आणि एका दूध वाहतूक गाडीला झालेल्या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. उमरखेडनजीक पैनगंगा नदी पुलावर एक ट्रक उभा असताना नांदेडकडून उमरखेडकडे जाणारा दुसरा ट्रक आणि दूध घेऊन जाणाऱ्या वाहनानं एकाचवेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानं हा अपघात घडला.

दूध गाडी दोन ट्रकमध्ये अडकल्यानं त्यातील दोघांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाल्यानं मार्गावरील वाहतुक सकाळच्या सुमारास 2 तास खोळंबली होती.