बीड : घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कोसळलेत. (Tomato Prices Fall) टोमॅटो एक रुपया (Tomato Prices Fall to Rs 1 per kg) ते दोन रुपये किलो टॉमॅटो (Tomato) विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हा भाव एवढा कमी आहे. शेतामध्ये लागलेला खर्च वाहतुकीचा खर्चही निघेनासा झाला आहे. बीड जिल्ह्यातील बर्दापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन शेतकरी करतात. मात्र या वर्षी एक रुपया किलो टोमॅटो विकावा लागत असल्यामुळे शेतकरी हवालदिल (Farmers Crisis) झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, आता हे भाव इतके पडले आहेत की, एक रुपया किलो टॉमॅटो विकण्याची वेळ शेतकर्यांवर ओढवली आहे. हा भाव एवढा कमी आहे शेतामध्ये लागलेला खर्च आणि मेहनत ही सर्व वाया गेल्याचे चित्र सध्या याठिकाणी पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील बर्दापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन शेतकरी करतात. मात्र यावर्षी एक रुपया किलो टोमॅटो विकावा लागत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अचानकपणे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.