राज्यात वाघाची संख्या वाढली, जाणून घ्या आकडेवारी

राज्यात वाघाची संख्या वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Updated: May 29, 2019, 10:41 PM IST
राज्यात वाघाची संख्या वाढली, जाणून घ्या आकडेवारी  title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : राज्यात वाघाची संख्या वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील वनक्षेत्रात आज २५० मोठे वाघ आहेत. तसेच देशाच्या लोकसभेत वाघांची संख्या वाढली असून आगामी विधानसभेत ही वाघ वाढतील असे भाकीत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात वन विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसंदर्भात वन अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्याच्या वनक्षेत्रात २०१४ मध्ये २०४ मोठे वाघ होते. आज त्यांची संख्या २५० पर्यंत गेल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. अजून केंद्र सरकारने वाघांच्या वाढलेल्या संख्येबद्दल आकडे जाहीर केले नसले तरी महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या ४ वर्षात सुमारे २५ टक्के वाघ वाढल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी महाराष्ट्रात नेमके कोणते वाघ वाढले असे प्रश्न विचारताच मुनगंटीवार यांनी त्या वाघांची संख्याही वाढली आहे. गेले ५ वर्ष आपण त्या वाघाच्याही संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी हातात घेतलीच आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत ही त्या वाघाची संख्या वाढेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाची एक्सपायरी डेट संपली आहे. मात्र काँग्रेस पक्षातही काही सेवाभाव ठेवणारे नेते आहेत. अशा सेवाभावी नेत्यांना आम्ही आमच्या पक्षात घेणार अशी माहिती मुनगंटीवार यांनी नागपूरात दिली आहे.