पुण्यात घडली धक्कादायक घटना! Macho Man बनण्याच्या नादात पाहा 'त्या' तिघांनी काय केलं...

Three Youngsters are Arrested For Violence: हल्ली तरूणांमध्ये दादागिरी आणि मारामारी करण्याची वृत्ती (Violence in youth) बळकावताना दिसते आहे.

Updated: Nov 16, 2022, 05:16 PM IST
पुण्यात घडली धक्कादायक घटना! Macho Man बनण्याच्या नादात पाहा 'त्या' तिघांनी काय केलं... title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे Three Youngsters are Arrested For Violence: हल्ली तरूणांमध्ये दादागिरी आणि मारामारी करण्याची वृत्ती (Violence in youth) बळकावताना दिसते आहे. पार्टी (Partying), मजा मस्ती, रिलेशनशिप्स यामध्ये कायमच लुब्ध झालेले तरूण तरूणींमध्ये हिंसक रूपही जन्म घेत आहे. मध्यतंरी अशीच एक घटना व्हायरल (Mumbai Viral News) झाली होती ज्यात एक तरूणींचा ग्रुप दारू पिऊन दुसऱ्या तरूणींना मारत होते. त्यामुळे सध्या तरूणपिढीसमोर (Young Generation) अनेक आव्हानं असल्याचे यावरून दिसून येते. सुरक्षितता बाळगली की सर्वच काही ठीक होऊ शकते (Crime News in Pune) अशी परंतु तश्या प्रकारे तरूणांनी आपली सुरक्षा स्वत:हूनच बाळगायला पाहिजे अशी स्थिती उद्भवल्यानं आता तशी आव्हानं तरूणाईसमोर (Youth Challenges) आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे तुम्हाला चीड आल्याशिवाय राहणार नाही याप्रकरणी तिघांना (Three Youngsters are Arrested) अटकही करण्यात आली आहे. (three youngsters in pune cought by police after trying to hurt a boy)

बुधवार पेठेतील (Bhudhwar Peth) क्रांती चौकात काही तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचा सीसीटीव्ही वायरल (cctv) झाला होता. यामध्ये काही तरुण कोयत्याचा धाक दाखवून हाणामारी करत असल्याचे दिसून येत होते. रविवारी रात्री (Sunday) हा प्रकार घडूनही फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र माध्यमात यासंबंधीच्या बातम्या येतात पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल मोतीपवळे (वय 21, नरेगाव पुणे) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

कधी घडली घटना : 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी आणि त्याचे मित्र बुधवार पेठेतील क्रांती चौकात रविवारी मध्यरात्री साडेबारा (Midnight) वाजण्याच्या सुमारास थांबले होते. यावेळी दुचाकी घेऊन आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना कट (Plotting) मारून जात होते. फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर दुचाकी वरील तीन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 

पाहा नेमंक प्रकरण : 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

तर दुसरीकडे लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या पाठीवर वार केला. मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या मित्रालाही आरोपींनी डोक्यात लोखंडी कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (Crime news) अटक केले. सध्या तरूणांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उद्भवतो आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी स्वत:च घेणे अत्यंत आवश्यक ठरले आहे. हल्ली रात्री - अपरात्रीही असे प्रकार घडत असल्यानं पालकांनाही त्यांच्या पाल्यावर (Parents) लक्ष ठेवणे आवश्यक आहे.