तीन ट्रॅव्हल्स बसेसला अचानक आग

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

Updated: Jul 1, 2018, 02:49 PM IST
तीन ट्रॅव्हल्स बसेसला अचानक आग title=

जळगाव: प्रसन्न कंपनीच्या तीन ट्रॅव्हल्स बसेसला अचानक आग लागली. नशिराबाद रोडवर ही दुर्घटना घडली. अतिउच्च दाबाच्या विद्युत तारा या बसेसवर पडल्याने त्यांनी अचानक पेट घेतला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २ बंब गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे.

वाहनांना आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ

दरम्यान, वाहनांना आगी लागण्याचे प्रकार अलिकडील दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र, अतिउच्च दाबाच्या विद्युत तारा कोसळून लागलेल्या आगीचे प्रमाण कमी असले तरी, हे प्रकार गंभीर आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याने सर्व परिसर ओलसर असतो. त्यामुळे अशा वातावरणात विद्युत तारा कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

रविवार ठरला घातवार

आजचा रविवार हा घातवार ठरलाय. उत्तराखंड इथे झालेल्या बस अपघातात ४५ जणांचा बळी गेलाय. तर गडचिरोली जिल्ह्यात देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारची काळीपिवळीशी भीषण टक्कर झाली. या अपघातात ११ जण ठार झाले. तर भामरागड इथे ३ महिला बुडाल्या.