नक्षलवादी पती-पत्नी पोलिसांच्या चकमकीत ठार

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलींमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलींना कंठस्नान घालण्यात आलंय. सिरोंचा तालुक्यातल्या सिरकोंडा जंगलात ही चकमक झाली.

Updated: Apr 3, 2018, 10:58 PM IST
नक्षलवादी पती-पत्नी पोलिसांच्या चकमकीत ठार  title=

गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलींमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलींना कंठस्नान घालण्यात आलंय. सिरोंचा तालुक्यातल्या सिरकोंडा जंगलात ही चकमक झाली.

ठार करण्यात आलेल्यांमध्ये सुनील कुळमेथे या जहाल नक्षलवाद्याचा समावेश आहे. सुनीलची पत्नी स्वरुपा उर्फ आमसी पोचा तलांडीही यात ठार झाल्याची शक्यता आहे. तिच्यावर सहा लाखांचं बक्षीस होतं. तर सुनीलवर महाराष्ट्रात आठ लाखांचं आणि इतर नक्षल प्रभावित राज्यांत असं मिळून एकूण ३० लाखांच बक्षीस होतं.

२५ मार्चला मेंढरी जंगलात झालेल्या चकमकीत महिला नक्षलीला पोलिसांनी ठार केलं. तर ३० मार्चला गुमडी जंगलातल्या चकमकीत एका नक्षलीला ठार केलं.

गेल्या आठवडाभरात गडचिरोली पोलिसांनी पाच नक्षलींना ठार केलं. सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.