पंढरपूर : पंढरपुरात अजित पवार (Ajit Pawar) यांना मोदींच्या सभेत भाषण न करू देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहूमधल्या तुकोबांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. (Pm Narendra modi in Dehu)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुकोबांच्या मंदिरात तसंच परिसरातल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. वारक-यांनी मोदींना वारकरी पगडी देऊन देहू नगरीत स्वागत केलं. तसंच माऊलींची मूर्ती आणि चिपळ्याही मोदींना भेट देण्यात आल्या. मोदींनी देहू नगरीतल्या नागरिकांना वंदन केलं. तुकोबांच्या ओवीनं भाषणाची सुरुवात करत मोदींनी वारक-यांशी संवाद साधला.
या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केलं. पण अजित पवारांना भाषणाची संधी न मिळाल्याने सुप्रिया सुळे नाराज झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधानांच्या स्वागसाठी विमानतळावर देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्यासोबत चर्चा केली.