रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2018, 01:33 PM IST
  रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता  title=

मुंबई : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवलीय. 

वादळी वाऱ्यासह पाऊस

पुढच्या 48 तासात कोकण किनारपट्टीवर वादळी वा-यासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे प्रशासनाने जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात. 

बागायतदार धास्तावले

 या अवकाळी पाऊस आणि वातावरण बदल्याच्या इशा-याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं मागे घेतलाय. राज्याच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. मात्र हिमालय परिसरातल्या हवामानामध्ये झालेल्या बदलांनंतर इशारा मागे घेण्यात आल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलंय.