अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात धान शेतीचा पहिला उपक्रम यशस्वी

पश्चिम विदर्भात जे कुणाच्या हाताला जमलं नाही बंदींनी करून दाखवलं.

Updated: Aug 3, 2020, 12:27 PM IST
अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात धान शेतीचा पहिला उपक्रम यशस्वी title=

अमरावती : विदर्भात सर्वाधिक धान शेती भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये होते. पण आता पश्चिम विदर्भातील धान शेतीचा प्रयोग यशस्वी झालाय. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात धान शेतीचा पहिला यशस्वी उपक्रम झालाय. पश्चिम विदर्भात जे कुणाच्या हाताला जमलं नाही बंदींनी करून दाखवलं.

व्यक्तीच्या हातुन कळत न कळत रागाच्या भरात एखादा मोठा गुन्हा घडतो. मग काळ्या दगडाच्या पाषाण आळ त्याला संपुर्ण आयुष्य त्या कारागृहाच्या भिंतीआळ काढाव लागत असत. पण त्या बंदी बांधवांच्या अंगी असलेले चांगले गुणही वाखनण्या जोगे असतात. 

एखादा गुन्हा केला की समाज त्याना वाईट नजरेने बघतो. पण त्यांच बंदींनी मुबलक पाण्याचा फायदा घेऊन पश्चिम विदर्भातील पहिला धान शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. तो ही अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहा अंतर्गत येणाऱ्या २० एकर शेती पैकी दोन एकर शेतीवर. मागील पाच वर्षांपासून हे बंदी बांधव यशस्वी अशी धान शेती करतात. 

कारागृह म्हटले की गुन्हेगारांचे स्वतंत्र गाव असे चित्र समोर येते. मात्र या गावातही कष्टकरी, श्रमकरी व शेती करण्याचे गुण अंगी असलेले बंदी वास्तव्यास आहे. अमरावतीतील मध्यवर्ती कारागृहच्या अंतर्गत येणाऱ्या खुले कारगृह मध्ये २० एकर शेती आहे. या मधे सर्वच प्रकारचे कामे नेहमी ३४ बंदी करतात. परंतु कोरोनामुळे सध्या १२ बंदी काम करत आहे. त्यांच्या या कामाचा त्यांना मोबदलाही दिला जातो. 

विदर्भात धान शेती फक्त गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर याच जिल्ह्यात होते. परंतु आता बंदी जणांच्या मेहनतीने अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहाच्या जमितही धान पीक मागील पाच वर्षांपासून घेतले जात आहे. सोबतच इतरही पालेभाज्या, गहू, आधी धान्याचे इथं पीक घेतले जात असल्याने पौष्टिक आहार हा कारागृहात बंदी जणांना मिळते.

या २० एकर शेतीवर विविध पिके घेतली जातात सोबत बैलजोडी, शेळ्या, गाय इत्यादी जनावरे सुद्धा आहे. शेळी पालनातून लाखो रुपयांचा नफा हा कारागृहाला मिळत असतो. 

मागील पाच वर्षांपासून सुरू असलेली धान शेतीची लागवड यावर्षी ही केल्या गेली आहे. समाज ज्यांना वेगळ्या नजरेने पाहतो त्यांचं बंदीजनांनी मात्र अश्यक्य गोष्ट ती श्यक्य करून दाखवली आहे.