2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा? फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्यानं ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारीत पुन्हा परीक्षा होणार आहे. 

Updated: Dec 26, 2023, 07:15 PM IST
2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा? फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट title=

BARTI Fellowship Exam: राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी  घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठा गोंधळ झाला होता.  2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा आला होता असा दावा केला जात आहे.   फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  फेलोशिपच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याने  ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती.  पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत 2019 झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना देण्यात आली.मात्र, त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी  घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे  परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

परीक्षेत नेमका काय गोंधळ झाला?

छत्रपती संभाजीनगरमध्ये बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिपच्या परिक्षेतला सावळा गोंधळ झाला होता. 2019 चाच पेपर जशाच्या तसा देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. 2023 चा पेपर हा 2019 ला घेण्यात आलेल्या पेपरची पूर्ण कॉपी होता. अगदी प्रश्नांचा क्रमसुद्धा जशाच्या तसा होता असा आरोप करत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आरोप आक्षेप घेतला. इतकंच नाही तर प्रश्नपत्रिका वाटताना त्या सिलबंद पाकिटात नव्हत्या, विद्यापीठ प्रशासन आयोगाच्या नियमानुसार प्रश्नपत्रिकांचं वाटप झालं नाही असाही आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. प्रशासनानं या गोंधळाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. शिष्यवृत्ती परीक्षेतल्या या सावळ्यागोंधळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. फेलोशिप प्रश्नपत्रिकाप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.