Kelshi Sand Dune : दगडांचे, मातीचे डोंगर आपण नेहमीच पाहत असतो. पण दगडाच्या डोंगरा इतका वाळूचा मोठा डोंगर देखील आहे असं कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रातील कोकण प्रांतात असा भला मोठा वाळूचा डोंगर आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीमुळे हा वाळूचा महाकाय डोंगर तयार झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दोपीलीत हा वाळूचा डोंगर आहे. दापोली हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
कोकणातील केळशीचा समुद्र किनारा वाळुच्या डोंगरासाठी (sand dunes) प्रसिध्द आहे. कोकणात अथवा महारष्ट्रात कुठेही अशा प्रकारचा वाळुचा डोंगर कुठेच पहायला मिळत नाही. केळशी गावच्या पश्चिमेस असलेला वाळूची डोंगर म्हणजे निसर्गाचा अद्भूत चमत्कारच म्हणावा लागेल. दापोलीतील भारजा नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो. त्या संगमावरच हा वाळूचा महाकाय डोंगर आहे. हा डोंगर म्हणेज केळशी गावची सुरक्षा भिंतच आहे.
समुद्राकडून म्हणजेच पश्चिमेकडून येणाऱ्या वादळापासून केळशी गावचे संरक्षण होते ते या वाळूच्या डोंगरामुळेच. हा वाळूचा डोंगर नामशेष झाल्यास केळशी गावाला भविष्यात मोठा धोका निर्माण होवू शकतो.
अंदाजे पंधराव्या शतकात भारतात प्रलयकारी त्सुनामी आला होता. या त्सुनामीनंतर समुद्रात उठलेल्या वाळूच्या वादळाची (sand storm) वाळू या ठिकाणी बसली आणि येथे वाळूचा महाकाय डोंगर निर्माण झाला. सात वाळूच्या टेकड्यांवर केळशी गाव वसलेले आहे. सातत्याने सुमद्रात उठणारी वादळे, भरती - ओहटी यामुळे या वाळूंच्या डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाळूचा डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाळूचा हा डोंगर अठरा मीटर उंच होता. आता याची झिज होवून तो फक्त आठ मीटर उंचीची राहिला आहे.
त्सुनामीमुळे निर्माण झालेला वाळूचा डोंगर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. दापोलीत फिरायला येणारे पर्यटक केळशीला जाऊन हा वाळूचा डोंगर नक्की पाहतात. केळशी गाव पुण्यामुंबई पासून अंदाजे पाच तासांच्या अंतरावर आहे.
या डोंगराखाली मोठा खजिना दडला असल्याच्या अनेक कथा स्थानिकांकडून ऐकायला मिळतात. खजिना शोधण्यासाठी स्थानिकांनी तसेच आसपासच्या परिसरातील अनेकांनी हा डोंगर पोखरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भौगिलीक दृष्ट्या गावाचे नैसर्गित आपत्तीपासून बचाव करण्यासाठी या डोंगराचे संवर्धन होणे अत्यंत म्हत्वाचे आहे.