Live निकाल महाराष्ट्राचा : ठाणे-पालघरमध्ये महायुतीने गड राखला

ठाणेकरांचा कौल कुणाला? 

Live निकाल महाराष्ट्राचा : ठाणे-पालघरमध्ये महायुतीने गड राखला  title=

ठाणे - 288 जागांकरता मुंबई, ठाणे,पालघरसह महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदाराचा निरूत्साहच पाहायला मिळाला. मुंबईत फक्त 58.49 टक्के मतदान झाले. मुंबईबरोबरच यंदा सगळ्यांचे लक्ष हे ठाणे-पालघर विधानसभेकडे देखील लागून राहिले आहे. थोड्याचवेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. ठाणे- पालघर  विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचे निकाल लाईव्ह या पेजवर पाहता येणार आहे. 

लाईव्ह अपडेट्स

ठाणे - पालघर विधानसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार 

डहाणू मतदार संघातून सीपीएमचे विनोद निकुळे 71140 मतांनी विजयी 
विक्रमगड मतदार संघातून काँग्रेसचे चंद्रकांत भुसारा 88264 मतांनी विजयी 
पालघर मतदार संघातून काँग्रेसचे योगेश नाम 27687 मतांनी विजयी 
बोईसर मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील 78,671 मतांनी विजयी 
नालासोपारा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर 1,48,952 मतांनी विजयी 
वसई मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर 97244 मतांनी विजयी 
भिवंडी-ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे शांतारम मोरे 83367 मतांनी विजयी 
शहापूर मतदार संघातून काँग्रेसचे दौलत दरोडा 75804 मतांनी विजयी 
भिवंडी पश्चिम मतदार संघाचे भाजपचे प्रभाकर चौघुले 58816 मतांनी विजयी 
भिवंडी पूर्व मतदार संघातून समाजवादी पार्टीचे रईस शेख 45531 मतांनी विजयी
कल्याण पश्चिम मतदार संघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर 38314 मतांनी विजयी 
मुरबाड मतदार संघातून भाजपचे किसन कठोरे 1,46894 मतांनी विजयी 
अंबरनाथ मतदार संघातून शिवसेनेचे डॉ बालाजी किनीकर 59862 मतांनी विजयी 
उल्हासनगर मतदार संघातून भाजपचे कुमार अलियानी 43577 मतांनी विजयी 
कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपचे गणपत गायकवाड 45413 मतांनी विजयी
डोंबिवली मतदार संघातून भाजपचे रविंद्र चव्हाण 86,110 मतांनी विजयी 
कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनेसेचे प्रमोद (राजू)पाटील 90816 मतांनी विजयी 
मिरा-भाईंदर मतदार संघातून अपक्ष उमेदवार गीता जैन 79,527 मतांनी विजयी 
माजिवाडा-ओवला मतदार संघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक 1,05,769 मतांनी विजयी 
कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून शिवसनेचे एकनाथ शिंदे 1,06,667 मतांनी विजयी 
ठाणे मतदार संघातून भाजपाचे संजय केळकर 91,771 मतांनी विजयी 
मुंब्रा-कळवा मतदार संघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड 1,09,014 मतांनी विजयी 
ऐरोली मतदार संघातून भाजपच्या गणेश नाईक 1,14,038 मतांनी विजयी 
बेलापूर मतदार संघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी 87518 मतांनी विजयी 

दुपारी 3.58 वाजता - बेलापूर विधानसभा निवडणूकीत भाजपच्या मंदा म्हात्रे 45,125 मतांनी विजयी झाल्या आहेत 

दुपारी 12.52 वाजता - डोंबिवली विधानसभा मतदार संघ 16 वी फेरीचा निकाल
आतापर्यत एकूण मते- भाजपचे रवींद्र चव्हाण  यांना 58999 मते मिळाली. तर मनसे मंदार हळबे यांना 33707 मते मिळाली. तर डोंबिवलीमध्ये नोटाला 2695 मते मिळाली. रवींद्र चव्हाणांची आघाडी 25292 मतांनी आहे. 

दुपारी 12.50 वाजता - बेलापूर विधानसभा - 151 च्या 12 व्या फेरीचा निकाल 
BJP: मंदा म्हात्रे 3408
NCP: अशोक गावडे 1367
MNS: गजानन काळे 854
भाजपाच्य मंदाताई म्हात्रे या 19126 मतांनी आघाडीवर

दुपारी 12.40 वाजता - कोपरी -पाचपाखाडी मतदार संघातून एकनाथ शिंदे विजयी, काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा पराभव

दुपारी 12.30 वाजता - ठाणे शहर विधानसभा मधून भाजपचे संजय केळकर विजयी 

दुपारी 12.15 वाजता - कळवा -मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस चे जितेंद्र आव्हाड विजयी..

सकाळी 11.55 वाजता - ओवळा -माजिवडा मतदार संघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी

सकाळी 11.48 वाजता - पालघर विधानसभेचा निकाल हाती, शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा विजयी, काँग्रेसच्या योगेश नम यांचा पराभव 

सकाळी 10.46 वाजता - आतापर्यंतचे आघाडीचे उमेदवार
ऐरोली भाजपा गणेश नाईक 
कल्याण पश्चिम शिवसेनेचे विश्वनाथ भोईर 
कोपरी पाचपखडी शिवसेनेचे एकनाथ शिंदे 
मुकबाड भाजपचे किसन कथोरे 
उरण येथे युतीचे उमेदवार मनोहर भोईर 
कल्याण पूर्व भाजपच्या गणपत गायकवाड 
अलिबाग शिवसेनेचे महेंद्र दळवी

सकाळी 10.38 वाजता - गणेश नाईक ऐरोलीतून आघाडीवर आहेत. गणेश नाईक यांना 17750 मतांनी आघाडीवर आहेत. सातव्या फेरीत गणेश नाईक 3499 मतांनी पुढे आहेत. तर मनसे नीलेश बाण खिले 2059 तर राष्ट्रवादीचे गणेश शिंदे यांना 702 मते मिळाली आहेत. 

सकाळी 10.35 वाजता - उरण विधानसभा मतदार संघाचा निकाल.  युतीचे उमेदवार मनोहर भोईर आघाडीवर असून आताच्या फेरीत 4673 मते मिळाली असून एकूण मते 21284 मिळाली आहेत. आघाडीचे उमेदवार विवेक पाटील यांना पाचव्या फेरीत 1889 मते मिळाली असून एकूण मते 21,058 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना 2915 मते मिळाली असून एकूण मते 22,277 हजार आहेत. 

सकाळी 10.28 वाजता - कल्याण ग्रामीण विधानसभेचा निकाल, मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांना 19629 मते मिळाली. तर शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना 16352 मते मिळाली. 

सकाळी 10.27 वाजता - कर्जत येथे मतमोजणी सहावी फेरी शिवसेनेचे महेंद्र थोरवे 4 हजार 264 मतांनी आघाडीवर 

सकाळी 10.25 वाजता - माजिवाडा-ओवला येथे प्रताप सरनाईक 16 हजार मतांनी आघाडीवर

सकाळी 10.22 वाजता - मीरा भाईंदर - 145 मतदार संघाचा निकाल, आतापर्यंत 4 फेऱ्या झाल्या आहेत. अपक्ष उमेदवार गीता जैन या आघाडीवर असून 12207 मते मिळाली आहे. गीता जैन या पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांना 5418 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या नरेंद्र मेहता यांना फक्त 8892 मते मिळाली आहेत. भाजपला हा फार मोठा फटका आहे. 

सकाळी 10.17 वाजता - कल्याण पश्चिम विधानेसभेचे निकाल, शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांना 8339 मते मिळाली आहेत. मनसेचे प्रकाश भोईर  3075 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नरेंद्र पवार यांना 2912 मते मिळाली आहेत. 

सकाळी 10.15 वाजता - ठाणे: ओवळा- माजिवडा मतदार संघ - 146  पाचव्या फेरीचा निकाल 
शिवसेनाचे प्रताप सरनाईक 4456 मतांनी आघाडीवर तर काँग्रेसचे विक्रांत चव्हाण 662 मते, मनसेचे संदीप पाचंगे यांना 1145 मते, नोटाला 169 मते आघाडी उमेदवार- शिवसेना प्रताप सरनाईक ( फेरी क्रमांक 1 ते 5 एकूण 20372 )16705 मतांची आघाडी

सकाळी 10.12 वाजता - अंबरनाथ - 3 फेरी अखेर शिवसेनेचे डॉ बालाजी किणीकर 1840 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे डॉ बालाजी किणीकर यांना 6309 मते, काँग्रेसचे रोहित साळवे यांना 4315 तर मनसेचे सुमेध भवार यांना 1515 मते मिळाली. वंचितचे धनंजय सुर्वे यांना 4469 मते 

सकाळी 10.11 वाजता - कर्जत - चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे महेंद्र थोरवे 2 हजार 730 मतांनी आघाडीवर, सुरेश लाड पिछाडीवर

सकाळी 10.10 वाजता -  मिरा भाईंदर विधानससभेचा निकाल, गीता जैन अपक्ष असून त्यांना 9808 मते मिळाली आहेत. आणि गीता जैन आघाडीवर आहेत.  नरेंद्र मेहता भाजप 6689 मते तर मुझफ्फर हुसेन कांग्रेस 4547 मते मिळाली आहेत. गीता जैन भाजप बंड खोर अपक्ष 3119 मतांनी आघाडीवर

सकाळी 9.57 वाजता - ऐरोली मतदार संघ 150 चा निकाल, गणेश नाईक दहा हजार मतांनी पुढे, चौथी फेरीचा निकाल
                                  भाजप गणेश नाईक - 3021मते 
                                  मनसे नीलेश बाण खिले 961मते
                                   राष्ट्रवादी कॉग्रेस गणेश शिदे- 903 मते

सकाळी 9.54 वाजता - 143 डोंबिवली विधानसभेचा आतापर्यंतचा निकाल 
                                  भाजपचे रवींद्र चव्हाण 10689 मतांनी आघाडीवर 
                                   मनसेच्या मंदार हळबे 9054 मतांनी पिछाडीवर 
                                  1653 मतांची आघाडी

सकाळी 9.49 वाजता - बेलापूर मतदार संघ - 151, दुसाऱ्या फेरीचा निकाल भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर 3226 मते 
                                 राष्ट्रवादीचे अशोक गावडे दुसऱ्या क्रमांक 2831 मते 
                                 मनसेचे गजानन काळे तिसऱ्या क्रमांकावर 812 मते 

सकाळी 9.48 वाजता - उल्हासनगर | भाजापाचे कुमार आयलानी 3021 मतांनी आघाडीवर

सकाळी 9.46 वाजता - उल्हासनगर मतदारसंघाचा दुसऱ्या फेरीचा निकाल

                                 भाजपचे कुमार आयलानींना  2922 मते
                                 राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी 2318 मते
                                 वंचित बहुजन आघाडीचे साजन सिंग लभाना 110 मते
                                  अपक्ष उमेदवार भगवान भालेराव यांना 693 मते 

सकाळी 9.42 वाजता - 

सकाळी 9.40 वाजता - मीरा भाईंदर विधानसभेतून दुसऱ्या फेरीत बंडखोर अपक्ष उमेदवार गीता जैन आघाडीवर, 6795 मतांनी आघाडी तर भाजपचे नरेंद्र मेहता पिछाडीवर 

सकाळी 9.35 वाजता - मुरबाड विधानसभेचा निकाल 
                                  भाजपचे किसन कथोरे तब्बल 22 हजार  मतांनी पुढे 
                                  भाजपच्या किसन कथोरे यांना 27623 मते 
                                  राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांना 4942 मते 
                                  किसन कथोरे तब्बल 22681 मतांनी पुढे  

सकाळी 9.30 वाजता - डहाणू मतदारसंघातून भाजपाचे पास्कल धनारे 1000 मतांनी आघाडीवर 

सकाळी 9.28 वाजता - उल्हासनगर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीचा निकाल, भाजपचे कुमार आयलानी 2305 मतांनी आघाडीवर  

सकाळी 9.26 वाजता - बोईसर मतदार संघातून शिवसेनेचे विलास तरे आघाडीवर 

सकाळी 9.25 वाजता - पालघर मतदारसंघातून शिवसेनेची मुसंडी, श्रीनिवास वनगा आघाडीवर 

सकाळी 9.24 वाजता -  वसई विधानसभेतून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर 5300 मतांनी आघाडीवर 

 

सकाळी 9.23 वाजता - विक्रमगड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा आघाडीवर 

सकाळी 9.21 वाजता - कोपरी पाचपखडी मतदारसंघातून सुरूवातीपासून शिवसेनेचे एकनाथ शिंदे आघाडीवर 

सकाळी 9.20 वाजता - बोईसर मतदार संघातून शिवसेनेचे विलास तरे आघाडीवर 

सकाळी 9.16 वाजता - राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड 10297 मतांनी आघाडीवर 

सकाळी 9.13 वाजता - नवी मुंबई - बेलापूर मतदारसंघात पहिल्याच फेरीत
                                  भाजपच्या मंदा म्हात्रे 1607 मतांनी आघाडीवर,
                                   पहिल्या फेरीत मंदा म्हात्रे यांना 2899 मते 
                                    राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांना 1292 मते
                                    मनसेचे गजानन काळे यांना 783 मते 

सकाळी 9.11 वाजता - मुरबाड विधानसभेच्या पहिल्या फेरीचा निकाल
                                 भाजपचे किसन कथोरे आघाडीवर, 4991 मतांची आघाडी 
                                  राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव पिछाडीवर, 1147 पिछाडी 
                                  किसन कथोरे 3844 मतांची आघाडी 

सकाळी 9.06 वाजता - ठाणे मतदारसंघाचा पहिल्या मतमोजणी फेरीचा निकाल 
                                  मनसेचे अविनाश जाधव यांना 2673 मते 
                                  भाजपाचे संजय केळकर यांना 3457 मते 
                                  नोटामध्ये 187 मतांची नोंद 

सकाळी 9.05 वाजता - ऐरोली मतदारसंघात भाजपाचे गणेश नाईक दुसऱ्या फेरीतही आघाडी, 3800 मतांनी आघाडीवर 

सकाळी 9.03 वाजता - उल्हासनगर मतदारसंघातून भाजपचे कुमार आयलानी 1902 आघाडीवर 

सकाळी 9.02 वाजता - कोपरी, पाचपखडी मतदारसंघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे आघाडीवर, 11 हजार 783 मतांनी आघाडी 

सकाळी 9 वाजता - अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे डॉ बालाजी किणीकर पहिल्या फेरी अखेरीस आघाडीवर, 564 मतांनी आघाडी 

सकाळी 8.54 वाजता - ऐरोली विधानसभेचा पहिल्या फेरी अखेरीस निकाल 
                                  भाजपच्या गणेश नाईक यांना 3422 मते 
                                   मनसेच्या नीलेश बाणखिले यांना 1358 मते 
                                  राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांना 795 मते 

सकाळी 8.52 वाजता - कळवा -मुंब्रा विधानसभेत दुसऱ्या फेरीत जितेंद्र आव्हाड 6 हजार मतांनी आघाडीवर 

 

सकाळी 8.48 वाजता - ऐरोली विधानसभेत भाजपचे गणेश नाईक आघाडीवर, 2100 मतांनी आघाडी

सकाळी 8.44 वाजता - कळवा-मुंब्रा विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड आघाडीवर, शिवसेनेच्या दीपाली सय्यद पिछाडीवर, दोघांमध्ये मोठी लढत 

सकाळी 8.42 वाजता - कोपरी पाचपखडीत 3 हजार 332 चा लीड, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना 4230 मत तर काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांना 898 मत 

सकाळी 8.41 वाजता - मुरबाड मतदारसंघातून भाजपचे किसन कथोरे आघाडीवर 

सकाळी 8.40 वाजता : उल्हासनगरमधून भाजपचे कुमार आयलानी 400 मतांनी आघाडीवर 

सकाळी 8.36 वाजता - ठाणे शहरातून भाजपचे संजय केळकर आघाडीवर 

सकाळी 8.35 वाजता - डहाणू मतदारसंघातून भाजपचे पास्कल धानोरे आघाडीवर 

सकाळी 8.34 वाजता - बोईसर मतदारसंघात अपक्ष उमेदवार संतोष जनाठे आघाडीवर 

सकाळी 8.30 वाजता - ओवला माजीवडा | शिवसेनेचे प्रताप सरनाईक आघाडीवर 

सकाळी 8.29 वाजता - विक्रमगड मतदर संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा आघाडीवर 

सकाळी 8.26 वाजता - कोपरी पाचपाखडी | शिवसेनेचे एकनाथ शिंदे आघाडीवर 

सकाळी 8.25 वाजता - वसई | पोस्टल मतदानाला सुरूवात 391 मतदान 

सकाळी 8.19 वाजता - अंबरनाथ | अजूनही पोस्टल मतमोजणीला सुरूवात नाही 

सकाळी 8.18 वाजता - ऐरोली | गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला 

सकाळी 8.14 वाजता - नवी मुंबई | ऐरोली-बेलापूर येथे मतमोजणी केंद्रावर पोस्टलल मतदानाला सुरूवात 

सकाळी 8.12 वाजता - राष्ट्रवादीचे जितेंद्र ठाकूर यांनी 10 वर्षात काही कामच केली नाहीत. त्यामुळे मला ही मोठी लढत वाढतच नाही - शिवसेना उमेदवार दीपाली सय्यद 

सकाळी 8.10 वाजता : परिक्षा दिली आहे, आता रिझल्टची वाट पाहतोय - कळवा-मुंब्रा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दीपाली सय्यद 

सकाळी 8.08 वाजता : नालासोपारा | पोस्टल मतदानास सुरूवात, नालासोपारा विधानसभेच्या जागेकरता शिवसेनेचे प्रदीप शर्मा आणि बविआचे क्षितीज ठाकूर यांच्यात मोठी लढत 

सकाळी 8.05 वाजता : कळवा - मुंब्रा येथे मतमोजणीपूर्वीच गोंधळ, स्ट्राँग रूमचे सील तोटल्याचा आप करून आरोप 

सकाळी 8.06 वाजता : रिकाम्या ईव्हीएम मशिन आढळल्याचा आपचा आरोप, निकालापूर्वीच गोंंधळ सुरू 

सकाळी ७.४५ वाजता : थोड्यात वेळात मतमोजणीला सुरुवात होणार, आधी पोस्टल मतदान

तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ

LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र

LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र

ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 18 मतमोजणी केंद्रावर होणार असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे. ठाणे जिल्ह्यात 18 जागांकरता निवडणूक झाली. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्यात 1.11 करोडहून अधिक लोकसंख्या आहे. यातील 84.53 टक्के साक्षर आहेत. ठाणे विधानसभेच्या जागांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या तीन दशकात भाजप- शिवसेनेची सत्ता आहे. 

ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा 

भिवंडी ग्रामीण, शाहपूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण, मीरा-भाइंदर, ओवला माजीवाडा, कोपरी-पाचपाखडी, ठाणे, मुंब्रा-कलावा, ऐरोली, बेलापूर 

ठाणे विधानसभेच्या जागेची टक्कर ही भाजपचे आमदार संजय केळकर आणि मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यात आहे. तसेच यंदा राष्ट्रवादीकडून सुहास देसाई यांना तिकिट देण्यात आली पण अगदी शेवटच्या क्षणी ते मैदानातून बाहेर आले. तसेच राष्ट्रवादी मनसेला समर्थन देत आहे. शिवसेना देखील या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक होईल पण भाजपने नकार दिला. नालासोपारा विधानसभेच्या जागेकरता शिवसेनेचे प्रदीप शर्मा आणि बविआचे क्षितीज ठाकूर यांच्यात मोठी लढत आहे. या मतदारसंघात वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा सुरूवातीपासूनच चर्चेत राहिले.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पालघरमध्ये एकूण २१७७ मतदान केंद्रे उभारण्यात येत असून यामध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघात ३२७, विक्रमगडमध्ये ३४८, पालघरमध्ये ३२२, बोईसरमध्ये ३५३, नालासोपारा मध्ये ४८९ आणि वसई मतदार संघात ३३८ केंद्रांचा समावेश आहे. डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई मतदार संघ पालघरमध्ये आहेत.