महाराष्ट्रातील भयाण वास्तव; वडिलांना कावड करून मुलाने 18 किलोमीटर दूर रुग्णलयात नेले

जखमी वडिलांना कावड करुन रुग्णलयात नेण्याची वेळ एका मुलावर आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 27, 2024, 11:27 PM IST
महाराष्ट्रातील भयाण वास्तव; वडिलांना कावड करून मुलाने 18 किलोमीटर दूर रुग्णलयात नेले title=

Gadchiroli News:  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका म्हणजे अतिदुर्गम भाग. मुसळधार पावसाने या तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटतो. याच  शेतीकाम करताना घसरून पडलेल्या जखमी वडिलांना कावड करून मुलाने 18 किलोमीटरवरील रुग्णलयात नेले...गडचिरोलीच्या भामरागडच्या अतिदुर्गम भटपार गावात ही घटना घडलीये.

शेतकाम करताना मालू केये मज्जी हे पाय घसरून पडले. मुसळधार पावसासह महापूर त्यात बंद रस्ते यामुळे वडिलांना रुग्णालयात नेण्याचा प्रश्न मुलगा पुसू समोर होता...त्याने हिंमत न हारता खाटेची कावड केली आणि मित्रांच्या सहाय्याने ही कावड पामुलगौतमी नदीतील नावेत टाकून आणि नदी पार केल्यानंतर 18 किलोमीटर पायी प्रवास करत वडिलांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार पूर्ण झाल्यावर पुन्हा वडिलांना कावड करूनच घरी न्यावे लागले.

एक्स रे मध्ये त्यांच्या पायाचे हाड मोडल्याचे निदान झाले. त्यांना गडचिरोलीत दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र रस्ते मार्ग बंद असल्याने त्यांना पुन्हा एकदा कावड यात्रा करून भटपार गावी जावे लागले. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग साधनांची वानवा, दळणवळणाच्या अडचणी व हतबलता या घटनेने उघड झाली. दुसरीकडे मज्जी यांच्या मुलाचे पितृप्रेमही जगाने बघितले 

आशा वर्करचा धोकादायक प्रवास

गडचिरोलीत अतिदुर्गम भागात आशा वर्कर धोकादायक प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आलाय...स्वयंसेविका सुजाता पुंगाटी आपल्या छोट्या बाळाला घेऊन तुडुंब भरलेल्या नाल्यातून नावेने प्रवास करत होत्या. दुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा नसताना, आशा स्वयंसेविका सेवाभावाने काम करत आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.  भामरागड तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी नोंदविली गेली आहे. जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण भागातून  राज्यात सामान्यांना तर पूरस्थितीला तोंड द्यावचं लागतंय...मात्र, गर्भवती महिलांना याचा फार मोठा फटका बसतोय...भंडा-याच्या घानोडमध्ये पूरात अडकलेल्या गर्भवती महिलेला गावक-यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढलं...तर गडचिरोलीमध्येही अशीच घटना घडलीये.... 19 जुलैला आलापल्ली ते भामरागड यामार्गावरील रस्त्यावरील पर्यायी मार्गच वाहून गेला...त्यामुळे चक्क जेसीबीच्या सहाय्याने गर्भवती महिलेला एका ठिकाणाहून दुस-याठिकाणी नेण्यात आले.

नदी-नाल्यांच्या वेढ्यातून बचाव पथकांनी नागरीकांना सुखरूप काढले. याच दरम्यान पोलिस भरती लेखी परीक्षा असलेल्या 29 उमेदवारांना बोटी द्वारे अभियान राबवून जिल्हा मुख्यालयी सुखरूप पोचवण्यात आली. गडचिरोली तालुक्यातील कुंभी नाला भागातून शेतात काम करण्यासाठी गेलेल्या आणि अडकलेल्या शेतमजुरांना बचाव पथकाने काढून सुरक्षित स्थळी पोचविले