लातूर-उस्मानाबाद सीमेवरील निम्न तेरणा प्रकल्प १०० टक्के भरलं

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील निम्न तेरणा प्रकल्प 100 टक्के भरलं आहे. या धरणातून तेरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Sep 18, 2017, 09:20 AM IST
लातूर-उस्मानाबाद सीमेवरील निम्न तेरणा प्रकल्प १०० टक्के भरलं title=

उस्मानाबाद : लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील निम्न तेरणा प्रकल्प 100 टक्के भरलं आहे. या धरणातून तेरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पडत असलेल्या दमदार पावसामुळे माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प भरला आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील तेरणा नदीवर असणारे सर्वच आठ उच्च स्तरीय बंधाऱ्यांचे दरवाजेही काही मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे माकणी धरणाखालील गावांना तसेच आठ बंधाऱ्या खालच्या सर्वच गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना तेरणा नदीपात्राच्या परिसरात पुढील दोन-तीन दिवस न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.