भाविकांकडून पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल

बारामती तालुक्यातील करंजे इथल्या सोमेश्वर मंदिरात श्रध्देचा आधार घेत पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 14, 2018, 04:45 PM IST
भाविकांकडून पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल  title=

बारामती : बारामती तालुक्यातील करंजे इथल्या सोमेश्वर मंदिरात श्रध्देचा आधार घेत पैसे उकळणा-या पुजा-याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

कायदा तोडून चमकोगिरी

पुजा-याने चक्क हातात गवत्या जातीचा साप घेऊन  त्याच्या दर्शनासाठी भक्तांकडे पैसे मागितले. कोणताही साप हाताळणे, त्याला  बऱ्याच काळ आपल्या ताब्यात ठेवणे पशुपक्षी संरक्षण कायद्यात बसत नाही तरी या पुजाऱ्याकडे हा साप आला कुठुन असा ही प्रश्न आता उपस्थित होतोय.

उत्तर देण्यास टाळाटाळ

 हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालाय. याच्या चौकशीसाठी बैठक बोलावली असून संबंधितांन कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केलीय.