झाडाला जगवण्यासाठी केली शस्त्रक्रिया

गोंदियामधल्या देवरीमधल्या एका झाडाचं नुकतंच ऑपरेशन झालंय. या झाडावर शस्त्रक्रिया करुन त्याला जीवदान देण्यात आलंय. त्यासाठी पुढाकार घेतला तो  माजी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी. 

Updated: Jun 5, 2018, 10:52 PM IST
झाडाला जगवण्यासाठी केली शस्त्रक्रिया title=

माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया  : गोंदियामधल्या देवरीमधल्या एका झाडाचं नुकतंच ऑपरेशन झालंय. या झाडावर शस्त्रक्रिया करुन त्याला जीवदान देण्यात आलंय. त्यासाठी पुढाकार घेतला तो  माजी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी. अभिमन्यू काळे यांना निसर्ग भ्रमंतीची आवड. त्यांना फिरताना हे जखमी झाड दिसलं.. कुणीतरी जाणूनबुजून या झाडाचं साल काढून टाकलं होतं. झाडाचं साल काढलं की हळूहळू त्या झाडाचा मृत्यू होतो. झाडांच्या कत्तलीचा हा कट लक्षात येताच अभिमन्यू काळे यांनी झाडांच्या कत्तलीविरोधात गुन्हा दाखल केला. पण महत्त्वाचा प्रश्न होता झाडांना जगवण्याचा. मग झाडाला पुनर्जीवन देण्यासाठी या झाडावर साल प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मोवाच्या झाडाचं साल काढून सावरीच्या झाडाला लावण्यात आलं. ऑपरेशन यशस्वी झालं.... आता सावरीच्या झाडाला पुन्हा पालवी फुटलीय. एखाद्या झाडाचं साल काढून त्याला पुनर्जीवित करण्याचा बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा..... आता या झाडाला पालवी फुटली असली तरी वर्षभर या झाडाची देखभाल करण्यात येणार आहे. अशा प्रकारे राज्यातल्या अन्य झाडांनाही कसं पुनरुज्जीवीत करता येईल, याचं संशोधन सुरू आहे.