Supriya Sule reaction on ajit pawar Rebellion: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोडून गेलेल्या प्रत्येकाविषयी आदर आहे. अजितदादा परत आले तर आनंदच आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 1980 ची पुनरावृत्ती पुन्हा होणार की नाही हे काळच ठरवेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. आम्हाला वेदना देणारी घटना आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात होतो. संघटना उभी करायची जबाबदारी आमच्यासमोर असेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मी कोणाच्या बाजूने नाही. मी पक्षाच्या बाजूने आहे. शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता येत्या 5 तारखेच्या बैठकीत चर्चा होईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा - राज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!
दादा आणि माझ्यात जे काही बोलणं झालं हे आम्हालाच माहितीये. आमच्यात वाद होऊच शकत नाही. माझ्या मनात अजितदादा कायम मोठा भाऊ राहिल. वयक्तीक पातळीवर आमच्यात वाद होऊच शकत नाही. मात्र, पक्षाच्या पातळीवर निर्णय घेयला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.