एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

विषारी औषध सेवन करुन केली आत्महत्या  

Updated: Jan 3, 2021, 07:55 AM IST
एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या title=

औरंगाबाद : घाटीत एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा १ जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास मृत्यू झाला. यश नरसिंगराव गंगापूरकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो 25 वर्षांचा यशने उचलेल्या या टोकाच्या  पाऊलामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

यश गंगापुरकर हा गेल्या दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. विष पिऊन त्याने आत्महत्या केली असून त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

त्याने आत्महत्या का याचे कारण अद्याप कळू शकले नाही. यश ब्राह्मण गल्ली बेगमपुरा येथे आई आणि बहिणीसोबत राहत होता. २५ डिसेंबर रोजी त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.